मालवण-पणजी, मालवण विजापूर बसफेरी उद्या पासून सुरु

मालवण | प्रतिनिधी : मालवण एसटी आगारातून पणजी तसेच विजापूर मार्गांवर बस सेवा सुरु करण्यात आली आहे. सोमवार 11 डिसेंबर पासून ही फेरी सुरु करण्यात येत आहे. अशी माहिती मालवण आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी दिली.

मालवण पणजी ही बसफेरी पहाटे 5:15 वा. मालवण येथून सुटून सकाळी 8:50 वा. पणजी येथे पोहचेल. तर पणजी येथून सकाळी 9:25 वाजता सुटून दुपारी 1:15 वाजता मालवण येथे पोहचेल.

मालवण विजापूर ही बसफेरी सकाळी 9:30 वा. सुटून फोंडा अथनी मार्गे सायंकाळी 7:35 वा. विजापूर येथे पोहचेल. तर विजापूर येथून दुपारी 11:30 विजापूर मालवण ही बसफेरी निघून रात्री 9:15 वा. मालवण येथे पोहचेल. अशी माहिती देण्यात आली आहे.