गुहागर l प्रतिनिधी :गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने गुहागर तालुक्यातील सर्व समाजाच्या तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी १० वाजता कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह गुहागर कीर्तन वाडी रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी तिमिरातून तेजाकडे या सामाजिक संस्थेचे सत्यवान रेडकर हे करणार आहेत. यूपीसी, एमपीसी, स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवा यांच्या परीक्षा तयारी याच मार्गदर्शन या शिबिरातून उपस्थित तरुणांना मिळणार आहे. तरी या करिअर मार्गदर्शन शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन गुहागर तालुका भंडारी समाज अध्यक्ष भरत शेटे, सेक्रेटरी निलेश मोरे यांनी केले आहे.











