कारण उलगडलं नाही पण दोघांनी दोघांना बेदम मारलं; प्रकरण पोलिसांकडे गेलं

crime marhan

रत्नागिरी | प्रतिनिधी : अज्ञात कारणातून दोघांना हातांच्या थापटांनी मारहाण केली.ही घटना शनिवार 9 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वा. शिवखोल येथे घडली आहे.

मरजान सिराज भाटकर (रा.शिवखोल, रत्नागिरी) आणि अन्य एक जण या दोघांविरोधात फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,शनिवारी रात्री फिर्यादीचा मित्र शिवखोल येथील प्रिंटिग प्रेसजवळ बसलेला होता. त्यावेळी त्याने फिर्यादीला हाक मारुन बोलावून घेतले. फिर्यादी त्याठिकाणी गेले असता मरजान भाटकर आणि त्याचा सहकारी हे दोघे फिर्यादीच्या मित्राजवळ थांबून फिर्यादीला शिवीगाळ करत होते. फिर्यादी त्याठिकाणी गेले असता दोन्ही संशयितांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला हातांच्या ठोशांनी मारहाण केली.यात फिर्यादीच्या जबड्याच्या वरील बाजुचा दात पडलेला आहे.तसेच या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून नुकसान होउन हातातील अंगठीही गहाळ झाली आहे. याप्रकरणी दोन्ही संशयितांविरोधात भादंवि कायदा कालम 324, 323, 504, 506, 472, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.