चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरानजीकच्या मिर्या येथील नॅशनल हायवेच्या कामाच्या ठिकाणी आराम करणारा कामगार स्वरुपसिंह भैरवसिंह (20,रा.जोधपूर,राजस्थान) याच्या पायावर मिस्कर गेल्याने त्याचा मृत्यू झाला.ही घटना रविवार 10 डिसेंबर रोजी दुपारी 1.15 वा.घडली आहे.
या प्रकरणी मिक्सर चालक विश्वनाथ बृहस्पती भुजवा (33,रा.जि.सिंधी राज्य मध्यप्रदेश)याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वरुपसिंहच्या चुलत भावाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,रविवारी दुपारी स्वरुपसिंह भैरवसिंह हा मिर्या येथे चालू असलेल्या नॅशनल हायवे नं 166 च्या कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या बाजुला आराम करत होता.त्यावेळी संशयित विश्वनाथ भुजवा हा आपल्या ताब्यातील ट्रान्झेस्ट मिस्कर (टीएम) (एमएच-08-एपी-6230) घेउन तेथून जात असताना मिक्सचे चाक स्वरुपसिंहच्या डाव्या पायावरुन गेले. यात तो गंभिर जखमी झाल्याने त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतू उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी मिक्सर चालकाविरोधात भादंवि कायदा कलम 304 (अ),279,337,338,मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











