वैभववाडी l प्रतिनिधी : नावळे गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवी, ब्राह्मणदेवाचा वार्षिक जत्रोत्सव (देव दिवाळी) बुधवार दि. 13 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे बुधवारी सकाळी भगवती देवी मंदिरात देवीची विधिवत पूजा करण्यात येणार आहे. दुपारी पालखी रामेश्वर देवाची भेट घेऊन ब्राह्मण देवाचे भेटीला जाईल. त्या ठिकाणी गावातील सर्व मंडळीं व माहेरवासणी, पावणे मंडळीं यांनी उपस्थित रहावे. रात्री पालखी ब्राह्मण देव मंदिराकडून श्री भगवती मंदिराकडे वाजता गाजत नेण्यात येईल. त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. यानिमित्त रात्री आमने सामने डंबलबारी भजनाचा बुवा संदिप कदम विरूद्ध बुवा अभिषेक शिरसाट यांच्यात जंगी सामना होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन नावळे देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.












