रत्नागिरी (प्रतिनीधी ) आगामी निवडणूकां पूर्वी जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय घेवू असे शासनाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे . निवडणूक आचार संहितेपूर्वी निर्णय घेवू असे त्यांनी म्हटले आहे असा विलंब सरकारने लावणे उचित नसून जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी दिनांक 14 रोजी च्या राज्यव्यापी संपात उतरण्यासाठी सज्ज व्हावे अन्यथा येणारा काळ कोणालाही माफ करणार नाही असे प्रतिपादन कास्ट्राईब शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव प्रशांत जाधव यांनी केले आहे .
आपला लढा हा शासन विरोधी नसून कर्मचारी हिताच्या बाजूने आहे कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क असलेली पेन्शन जुन्या पद्धतीप्रमाणे जशीच्या तशी मिळावी यासाठी आपण लढा देत आहोत . यावेळी जर आपण लढलो नाही तर भविष्यात कर्मचारी लढणेच विसरून जातील .यासाठी एकच मिशन , जुनी पेन्शन चा नारा देऊया आणि जुनी पेन्शन जशीच्या तशी प्राप्त करूया असेही आवाहनही त्यांनी केले आहे . जूनी पेन्शन सर्वांना हवी आहे कोणतीही संघटना त्या विरुद्ध नाही .असल्यास तसे जाहीर कोणीही केलेले ऐकीवात नाही त्यामुळे लढा देताना मागे राहू नका आपण विजयाच्या जवळ आहोत माघार घेऊ नका असेही ते पुढे म्हणाले आहेत.












