खेड शहरांमध्ये शंभर रुपयाचा बॉण्डचा तुटवडा

नागरिकांचे लुटमार जिल्हाधिकारी कार्यालयाने लक्ष घालण्याची मागणी

खेड(प्रतिनिधी) खेड शहरात सध्या प्रचंड प्रमाणात शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरची कृत्रिमरीत्या तुटवडा करून नागरिकांची लुटमार सुरू असल्याचा मत भाजप नेते माजी सरपंच श्री उदय उर्फ वीरसिंह बोरकर यांनी केले आहे नुकतेच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाने या महत्त्वाच्या विषयाकडे तातडीने लक्ष घालावे अशा आशयाचे निवेदन सादर केले आहे

सध्या शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवर प्रचंड प्रमाणात मागणी असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक शासकीय कामासाठी येतात त्यांना विविध प्रकारच्या काम करण्याकरता शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासते मात्र अधिकृत स्टंप विक्रेते शंभर रुपयाचा स्टॅम्प संपला असून तुम्हाला पाचशे रुपयाचा घ्यावा लागेल असे सांगितल्यामुळे त्या नागरिकांना नाहक जास्त पैसे मोजून ५०० रुपयांचा बॉण्ड विकत घ्यावा लागतो आहे

तसेच गेल्या काही महिन्यापासून पाच रुपयाचे कोर्ट फी तिकीट देखील बंद असल्याने वीस रुपयाचे किंवा दहा रुपयाचे तिकीट गरीब नागरीकाना घ्यावे लागते ही लूट ताबडतोब थांबवावी अशी मागणी भाजप नेते बोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे

नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या असून खर्चाचे निवेदन देण्यासाठी आवास योजना घरकुल यासह अनेकांना शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरची आवश्यकता असल्याने त्या ठिकाणी त्यांना पाचशे रुपये मोजावे लागल्याने अनेक ग्रा.प. चे उमेदवारांनी अनेक ग्रामस्थांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे हीच बाब बोरकर यांच्या लक्षात येतात बोरकर यांनी जिल्हा कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे