खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील किल्ले महिपतगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम रविवारी राबविण्यात आली, येथील सात दुर्गवीरांनी गडाचा खेड दरवाजा झाडी झुडपातून मोकळा केला.
या मोहिमेमध्ये दुर्गवीरचे श्री रोहित बालडे,स्वप्निल पाडावे,राकेश इंदुलकर,सौरभ भोसले,जय पाटील, स्वप्निल गायकवाड आणि श्रीरंग इंदुलकर यांनी सहभाग घेतला होता.लवकरच महीपतगडाचा खेड दरवाजा मातीच्या ढिगार्या खालून मोकळा करण्यास येणार असल्याचे रोहित बालडे यांनी सांगितले आहे, या पुढील मोहिमांमध्ये आपणही सहभागी घ्यावे आणि आपला ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुढे यावे असे आव्हाहन दुर्गवीर प्रतिष्ठान कडून करण्यात आले आहे.










