वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत श्री वेताळ मंदिर तुळस, खरीवाडा येथ रविवार दि. ०७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठिक ६.३० वा. जिल्हास्तरीय ‘नव्या भविष्यासाठी भरड धान्य’ दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हरित क्रांतीमुळे देशाच्या अन्नधान्य उत्पादनात बरीच वाढ झाली; मात्र त्यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांपेक्षा नकदी पिकांकडे अधिक वळू लागला. गेल्या काही वर्षांपासून जागतिक हवामान पालटाचा फटका शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
‘आधुनिक जीवनशैली’च्या नावाखाली अनेकांच्या आहाराच्या सवयीत पालट झालेले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी वर्ष २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. भरड धान्यात ज्वारी, बाजरी, राजगिरा, कोद्रो, कुटकी, सावा, राळा, वरई (भगर), नाचणी या पिकांचा समावेश होतो. जागतिक भरड धान्य उत्पन्नाच्या ४१ टक्के उत्पन्न भारतात होते. याचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर दैनंदिन आहारामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी या धान्याचे लाभ जनसामान्यांच्या मनावर विविध स्तरांतून बिंबवणे आवश्यक आहे त्यासाठी प्रचार प्रसिध्दी साठी सदर दौड स्पर्धेचे आयोजन केले आहे
सदर स्पर्धेत खुला पुरुष व महिला, इ.१ली ते २री, इ.३री ते ४थी, इ.५वी ते ६वी, इ.७वी ते ८वी , इ.९वी ते १०वी प्रत्येकी मुली व मुलगे अशा एकूण १२ गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्याना अनुक्रमे खुल्या पुरुष गटासाठी रु१५७५, १०७५,७७५ तर खुल्या महिला गटासाठी अनुक्रमे रोख रु६६६, ४४४,३३३ तसेच उर्वरित सर्व गटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
शालेय गटात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी ओळखपत्र किंवा शाळेचे शिफारस पत्र आणणे अनिवार्य आहे. अधिक माहिती व नाव नोंदणी साठी महेश राऊळ (९४०५९३३९१२) व प्रदीप परुळकर (९५५२४३६४७७) संपर्क करावा. असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.









