वेंगुर्ला दाभोली तेंडोली मार्गावर तात्काळ बस सेवा सुरू करा: हेल्प ग्रुप वांयगणीची एस टी आगाराकडे मागणी..

वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ला दाभोली तेंडोली मार्गावर सकाळी १० वा.१० मिनी. सुटणारी तेंडोली बस उशिराने येत असल्याने दाभोली स्कूल, पाटकर हायस्कूल मध्ये जाणाऱ्या मुलांचे पहिल्या तासिकेचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर संध्याकाळी येताना त्या मार्गावर एकही बस नसल्याने मुलांना चालत अथवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. हे लक्षात घेता हेल्प ग्रुप वांयगणी यानी आज एस टी. आगर प्रमुख वेंगुर्ला यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले व आगार प्रमुख यांच्याशी चर्चा केली.

निवेदन दिल्या नंतर तात्काळ बस सेवा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी सरपंच व हेल्प ग्रुप वायंगणी चे अध्यक्ष सुमन कामत, हर्षद साळगावकर, प्रवीण राजापूरकर, महेंद्र सातार्डेकर, सुनील नाईक, सिद्धेश कोचरेकर, उल्हास कामत, भिकाजी गावडे, राजेश घोलेकर, शेखर तोरस्कर, नारायण पेडणेकर, प्रशांत पेडणेकर, आदी उपस्थित होते.