राजाच्या स्मृतिदिनी बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार
रत्नागिरी | प्रतिनिधी : थिबा राजाच्या स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरीतील शिवाजीनगर येथील समाधीला,पुष्पहार अर्पण करून थिबाराजा कालीन बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यांनी अभिवादन केले.
थिबा राजा कालीन बुद्ध विहार स्थळ विकास चारिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी थिबा राजाच्या स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरीतील शिवाजीनगर येथील समाधीला अभिवादन करण्यासाठी गेले असता, तेथे खूप अस्वच्छता दिसून आली, पुरातत्व विभागाच्या वतीने तेथे कोणतीही साफ सफाई होत नसल्याचे दिसून येताच, ट्रस्टच्या वतीने स्वच्छता पदाधिकारी यांनी स्वच्छता केली.











