सावंतवाडी । प्रतिनिधी : सनातन धर्म रक्षक सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नारायण गुणाजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सनातन धर्म रक्षक सेनेची राष्ट्रीय कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य श्री विजय जी महाराज यांनी त्याची घोषणा केली. यात नारायण सावंत यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात सनातन धर्म रक्षक सेनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी समिती गठीत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबाबत सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.










