खेड(प्रतिनिधी) योगेशदादा यूथ फ़ाउंडेशन च्या मार्फ़त फ़ेसबुक च्या माध्यमातून दापोली विधानसभा आमदार योगेश रामदास भाई कदम यांचे नाव आणि फोटो वापरून समाजात अफ़वा पसरविन्या संबंधी पोस्ट काही समाजकंठक करत आहेत त्यांच्यावरती पायबंद घालावा तसेच कायद्याने कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी युवासेना खेड तालुक़ा मार्फ़त खेड पोलिस अधीक्षक अनिल भोईर यांना निवेदन सादर करण्यात आले
या प्रसंगी युवासेना तालुक़ाप्रमुख खेड चे सुरज रेवणे , शिवसेना शहरप्रमुख खेड कुंदन सातपूते , युवासेना उपतालुक़ाप्रमुख स्वप्निल सुर्वे , वाहिद ममदुले , सूरज मोगरे , माजी नगरसेवक पप्पू चिकने , बुवा शिंदे. युवासेना शहरप्रमुख सिद्धेश खेड़ेकर , युवासेना विभागप्रमुख चेतन पवार , विनोद खांबे , नवदीप काते , युवासेना विभाग सचिव अलीफ़ सुर्वे , युवासेना शाखाप्रमुख सनी भोसले , साईराज़ साळवी , ग्रामपंचायत सदस्य भोस्ते यासिन परकार , उद्योज़क शोएब ख़ान , रोहित मोरे , मनीष भुवड आदि युवासैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.










