राजापूर तालुका वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. शशिकांत सुतार यांची फेरनिवड

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. शशिकांत सुतार यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

राजापूर तालुका वकील संघटनेची बैठक नुकतीच येथे पार पडली. या बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये उपाध्यक्षपदी अ‍ॅड. पराग मोदी, सचिवपदी सुशांत पवार, सहसचिवपदी ॲड. राहुल राणे यांची तर खजिनदारपदी अ‍ॅड. अविनाश कुवेस्कर यांची फेरनियुक्ती करण्यात आली. तर महिला प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड. प्राची मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी अ‍ॅड. प्रशांत पाध्ये, अ‍ॅड. गुरुदत्त खानविलकर, अ‍ॅड. चंद्रशेखर अभ्यंकर, अ‍ॅड. यशवंत कावकर, अ‍ॅड. राहुल तांबे, अ‍ॅड. समीर कुंटे, अ‍ॅड. सुनिल मेस्त्री, अ‍ॅड. पराग हर्डीकर, अ‍ॅड. अरुण चिले, अ‍ॅड. स्वप्निल सावंत, अ‍ॅड. जमीर निं. खलिफे, अ‍ॅड. अभिषेक ढवळे, अ‍ॅड. रोझीना खोपेकर, अ‍ॅड. रूपाली बिर्जे, अ‍ॅड. प्रमिला शेटये, अ‍ॅड. अर्चना पाटील, अ‍ॅड. सारिका लोळगे, अ‍ॅड. प्रविण नागरेकर, अ‍ॅड. संकेत देवस्थळी, अ‍ॅड. कपिल राणे, अ‍ॅड. राजन देवरूखकर, अ‍ॅड. मंदार हर्डीकर,अ‍ॅड. तेरवणकर, अ‍ॅड. पळसमकर आदी उपस्थित होते.

यावेळी नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.