सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात पुढील भूमिका ठरविण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक सावंतवाडी व कणकवलीत होणार आहे. यात २४ तारखेला सावंतवाडी येथे श्रीराम मंदिरात सकाळी ११ वाजता तर २५ रोजी सकाळी १० वाजता कणकवली काॅलेज मध्ये ही बैठक होणार आहे.
यावेळी कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसाठी तसेच मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकी बाबत चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाणार आहे त्यामुळे या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे सचिव मिहीर मठकर व नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.











