राजीव गांधी स्कूल मंडणगडचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मंडणगड l प्रतिनिधी :  मंडणगड तालुका विकास मंडळ( F-1428)मुंबई संचलित राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने उत्साहपूर्ण वातावरण संपन्न झाले.

बुधवार दिनांक 27/12/2023 रोजी वेळेत सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.शेडगे सर व मुख्याध्यापक श्री. महाजन सर यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

शुक्रवार दिनांक 22/12/2023 रोजी सकाळी 9वाजता रांगोळी स्पर्धा तसेच शनिवार दिनांक 23/12/2023रोजी सकाळी 9 वाजता फूड स्टॉल चे आयोजन करण्यात आले होते.विविध फूड स्टॉल द्वारे विविध पदार्थांची मेजवानी सर्व विद्यार्थी, पालकांना देण्यात आली.तसेच 11वाजता फनी गेम्स साह्याने खेळांचे यशस्वी आयोजन करण्यात आले . आधुनिक खेळाच्या सहाय्याने सर्वांसाठी मनोरंजनाचे दालन खुले करून दिले.

मंगळवार दिनांक 26/12 /2023 रोजी सकाळी 9 वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये विविध प्रांतातील वेशभूषा केशभूषा च्या साह्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.

दुपारी 1.30 वाजता बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले .विविध उपक्रमात उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला .

विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देणारा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. टाळ्या शिट्ट्यांच्या प्रोत्साहन विद्यार्थिनी अभिनय, नृत्य ,नाट्य ,संगीत ,गायन यामधील वैयक्तिक सामूहिक विविधांगी कार्यक्रम आत्मविश्वासाने सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

स्नेहसंमेलन प्रमुख सौ.कर्वे मॅडम व सांस्कृतिक विभाग प्रमुख नेहा वाणी मॅडम यांच्या नियोजनानुसार कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सदस्य व स्कूल कमिटी चेअरमन श्री. संतोष मांढरे सर, मुख्याध्यापक श्री. शेडगे सर व मुख्याध्यापक श्री. महाजन सर यांच्या मार्गदर्शनासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.