वैश्यवाणी महामेळावा चिपळूणमध्ये जिल्हाध्यक्ष डॉ. विकास शेट्ये

मंडणगड | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील समाजाचा महामेळावा रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी चिपळूण येथील राधाताई लाड सभागृह वैश्य भवन चिपळूण येथे घेण्यात येणार आहे अशी माहिती रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विकास शेट्ये यांनी दिली आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील वैश्यवाणी ,एक गाव एक वाणी, अशा स्वरूपात विखुरलेला असला तरी संपूर्ण समाज संघटित आहे. वैश्य वाणी समाजाच्या तालुका पातळीवरील संघटनांबरोबरच गाव पातळीवर देखील 19 संघटना कार्यरत आहेत. त्याचबरोबर चिपळूण आणि रत्नागिरी येथे समाजाची पतसंस्था कार्यरत आहे .विविध ठिकाणी असलेला समाजबांधव त्या त्या गावातील काही प्रमुख धार्मिक .सामाजिक. राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. या सर्व संघटनांची मिळून जिल्हा पातळीवर अधिकृत नोंदणी झालेली अशी रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्था कार्यरत आहे.

या संस्थेमार्फत आणि चिपळूण येथील चिपळूण तालुका वैश्य समाज युवक संघटना. महिला संघटना, चिपळूण वैश्य वाणी पतसंस्था, यांच्या सहकार्याने यावर्षीचा जिल्ह्यातील वैश्यवाणी बांधवांचा महामेळावा घेण्याचे निश्चित झाले आहे. जिल्हाभरातून सुमारे दोन ते तीन हजार वैश्यवाणी बांधव या महामेळाव्यामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे.
या महामेळाव्यासाठी समाजाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार दीपक भाई केसरकर तसेच श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास या संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय आमदार श्री सदा भाई सरवणकर तसेच माजी आमदार माननीय श्री प्रमोद भाई जठार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महामेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध सेने निर्माते आणि उद्योजक श्री उदय दादा लाड यांचे शुभहस्ते आणि इंटरनॅशनल वैश्य फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री विभासजी खातू इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री दिलीप महेश्वरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमानिमित्त वैश्य वाणी समाजाच्या युवकांना करियर गायडन्स आणि व्यवसाय मार्गदर्शन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक श्री आनंद मापुस्कर तसेच एड विलास पाटणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत .
या महामेळाव्यानिमित्त रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाजाची दिनदर्शिका तसेच वैश्यरत्न या नावाने स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे.
यावर्षी प्रथमच या संस्थेतर्फे वैश्य वाणी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वैश्यवाणी बांधवांना वैश्य भूषण आणि वैशरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

महामेळाव्यात वैश्य वाणी समाजाच्या विविध अडचणी तसेच ओबीसी जात दाखला मिळविणे जात पडताळणी करणे याबाबत येत असलेल्या अडचणींवर मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच शासनाकडे अन्य सुविधा मिळविण्यासाठी काही ठराव करून पाठवण्यात येणार आहेत

या महामेळाव्याच्या तयारीसाठी जिल्हाध्यक्ष डॉ विकास शेट्ये यांचे समवेत उपाध्यक्ष श्री हेमंत शिरगावकर तसेच युवक अध्यक्ष श्रीनाथ खेडेकर महिला जिल्हाध्यक्ष सौ स्मिताताई लाड जिल्हा सचिव श्री माधव शेट्ये खजिनदार श्री श्रीराम माजलेकर कार्यकारिणीतील सदस्य श्री नरेंद्र बेलवलकर श्री राजेश खेडेकर श्री कौस्तुभ भिंगार्डे महिला उपाध्यक्ष सौ शिवांगी प्रसादे चिपळूण तालुका युवक अध्यक्ष श्री रोहन चौधरी युवक संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्री सौरभ मल्लूस्टे श्री गौरव शेट्ये, श्री राज विखारे यांचे समवेत जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भेटी देऊन ,बैठका घेऊन महामेळाव्याला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या महामेळाव्याला समाज बांधवांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तसेच सर्व प्रकारचे सहकार्य मिळत असल्याने हा महामेळावा यशस्वी होईल असे डॉ विकास शेट्ये यांनी सांगितले. वैश्यवाणी समाजाला जातीचा दाखला मिळविणे आणि जात पडताळणी करणे यामध्ये शासन दरबारी येत असलेल्या अडचणींबाबत आज माननीय नामदार अतुलजी सावे इतर मागास कल्याण मंत्री यांचे सोबत सविस्तर चर्चा करून याबाबत योग्य ते मार्गदर्शन आणि शासन निर्णय व्हावेत अशी विनंती करून निवेदन सादर केले माननीय नामदार सावे साहेब यांनी याबाबत पुढील पंधरा दिवसात शासनाकडून योग्य तो निर्णय दिला जाईल असे आश्वासन दिले आहे