वेंगुर्ले | प्रतिनिधी : राय. डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूल मठ आणि मान.श्री.सतीश गावडे यांच्या सहकार्याने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मठ सोनारमळी येथे बंधारा बांधून स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना अनोखे अभिवादन करण्यात आले. मठ येथील राय.डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल मठमधील इयत्ता 8 वी, 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांनी तसेच प्रशालेतील सर्व कर्मचारी आणि पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी श्री. सतीश गावडे, भगवान गावडे यांच्या सहकार्याने नुकताच मठ सोनारमळी येथे मातीचा बंधारा बांधण्यात आला.
यामुळे मठ गावातील आईरवाडी, मोबारकरवाडी, गावठणवाडी तसेच आजूबाजूचा परिसरतील पाणीसाठा वाढणार असून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. एस. ए.जाधव, राष्ट्रीय हरित सेनेच्या प्रमुख सौ. स्वप्नाली कांबळी मॅडम, श्री. गणुराज गोसावी सर, श्री. नरेंद्र नाईक, श्री.दिगंबर मोबारकर, श्री. अनिकेत कांबळे, तसेच कु. मयुर परब शालेय मुख्यमंत्री, कु. समीक्षा बावलेकर, कु. रेणुका बोवलेकर, समीक्षा मेस्त्री, अक्षदा गावडे, दिगंबर सावंत, श्रावणी धुरी, पायल सावंत, भविका आईर, हसरी होडवडेकर, सोहम गावडे, सईश गडेकर, सिद्धी सावंत, कृतिका धुरी, सुषमा गावडे, व्दारकानाथ कोकरे, आर्यन पवार, चिन्मय मठकर इत्यादी विद्यार्थी सहभागी झाले होते.









