किर्लोस येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रतिपूर्ती कार्यशाळा संपन्न!

Google search engine
Google search engine

 

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांच्यावतीने आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर

महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांच्यावतीने किर्लोस येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रतिपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमा अंतर्गत महिलांसाठी पाककृती स्पर्धा घेण्यात आली. वीस महिलांनी सहभाग दर्शविला. त्याच प्रमाणे महिला कर्मचारी यांनीही पाककृती कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ श्री विवेक सावंत उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री विश्वनाथ गोसावि, सरपंच श्रीम.साक्षी चव्हाण सरपंच, माजी सरपंच श्री प्रदीप सावंत, मंडळ कृषी अधिकारी श्री.अतुल कांबळे, कृषी अधिकारी श्री दिनेश लंबे, कृषी पर्यवेक्षक श्री धनंजय गावडे, कृषी पर्यवेक्षक श्री एस जी परब, कृषी पर्यवेक्षक श्री डी के सावंत, श्रीम. अमृता भोगले, श्रीम सुषमा धामापूरकर, श्रीम. मनीषा गीते, श्रीम.विध्या कुबल, श्रीम.स्नेहा चौखंडे, श्री पवन सांगडे, श्री सुशील कुमार शिंदे, श्री अश्विन कुरकुटे, श्री सुनील कदम, सर्व कृषी सहाय्यक,ग्रामपंचात सदस्य, श्रीम.राणे मुख्याध्यापिका उपस्थित होते.
डॉक्टर विलास सावंत व श्री विवेक सावंत भोसले यांनी पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व व तृणधान्यांमध्ये असणारे विविध घटक यांचा सेवन केल्यामुळे शरीराला कसा फायदा होतो व शरीर कसे सुदृढ राहते रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढते याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच तालुका कृषी अधिकारी श्री विश्वनाथ गोसावी यांनी शासनाच्या विविध योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी खेडोपाडी विविध कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ जास्तीत जास्त कसा घेता येईल याबाबत माहिती दिली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने बचत गटांनी फायदा घेण्याचे आवाहन केले तसेच कृषी विभाग मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना महाडीबीटी पोर्टलवर कशा पद्धतीने आहेत याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रम नियोजन श्रीम. जिकमडे, श्री डी के सावंत यांनी केले यावेळी प्रधानमंत्री शुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना बाबत श्री. अतुल कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले श्री दिनेश लंबे यांनी प्रास्ताविक केले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित पाककला कृतीमध्ये सहभाग ही घेतलेल्या महिलांना अनुक्रमे एक दोन तीन व उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री डी के सावंत यांनी केले