रामघाट कला क्रीडा मंडळाचा क्रीडामहोत्सव जल्लोषात साजरा..

Google search engine
Google search engine

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी
रामघाट कला क्रीडा मंडळाचा क्रीडामहोत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला.वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष कु शीतल आंगचेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी रामघाट कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष केदार आंगचेकर, प्रा. डॉ आनंद बांदेकर, जेष्ठ नागरिक प्रभाकर जबडे, शशिकांत साळगावकर, सुदेश आंगचेकर, नामदेव सरमलकर, सौ प्रार्थना हळदणकर, सौ.दीपा पेडणेकर, सौ वैष्णवी वायनगणकर, हेमंत गावडे, जयेश परब, बाळू धुरी, जॉन डिसोझा तसेच रामघाट कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते व रामघाट मधील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शीतल आंगचेकर म्हणाल्या की रामघाट कला क्रीडा मंडळ हे 1995 पासून स्थापन झाल्यानंतर वाडीतील महिला, पुरुष व मुलांना एक प्रकारे हक्काचे व्यासपीठ बनले आहे, सर्वांच्या उन्नतीचे साधन निर्माण झाल्याने व दरवर्षी क्रीडामहोत्सव साजरा होत असल्याने सर्वानाच क्रीडा प्रकारात भाग घेण्याची संधी मिळते. सर्वानाच यश मिळते असे नाही तर अपयशातून यश मिळत असल्याने मिळत असलेल्या संधीचे सोने येथील विद्यार्थी वर्ग करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या वाडीतील विद्यार्थी, विद्यार्थिनीं विविध क्रीडाप्रकारात सहभागी होऊन राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यशस्वी होत आहेत. या मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे.
तर प्रा.डॉ आनंद बांदेकर म्हणाले की, रामघाट कला क्रीडा मंडळ म्हणजे एकजुटीचे साधन आहे. महिला पुरुष एकत्र येऊन दरवर्षी 3 दिवस क्रीडामहोत्सव साजरा करतात म्हणजे वाडीचा सण साजरा करीत असल्याने वाडीमध्ये चैतन्याचे, आनंदाचे वातावरण असते. यावर्षी महिला पाक कला स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, फनी गेम्स, रस्सीखेच स्पर्धा संपन्न झाल्या. दरम्यान शुक्रवार 10 फेब्रुवारी 2023 रोजी बक्षीस वितरण समारंभ व कलेश्वर नाट्यमंडल, नेरूर यांचे ट्रिकसीन युक्त दशावतार नाटक आयोजित करण्यात आलेले आहे तरी क्रीडाप्रेमी व नाट्य प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.