तामिळनाडू येथील तरुणाला संविता आश्रमाचा आधार

कणकवली : तामिळनाडू येथील एक तरुण बेवारस स्थितीमध्ये कणकवली रेल्वे स्टेशननजीक आढळला. याबाबत जीवन आनंद संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष संदीप परब यांच्या संविता आश्रमाने देवासारखी धाव घेत त्याच्या पुनर्वसनासाठी संविता आश्रमात त्याला मायेचा आधार देत दाखल केले.

कणकवली रेल्वे स्टेशन रस्त्यावर निराधार व्यक्ती काळजी वाटावी अशा स्थितीत असल्याची माहिती हरकुळ बुद्रुक येथील अभिजित तांबे यांना पत्रकार प्रमोद म्हाडगुत यांच्या मदतीने पणदूर संविता आश्रमचे संस्थापक व जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांना दिली. त्यानंतर संविता आश्रम मधील केअरटेकर विजय नाईक व महाबळेश्वर कामत तत्काळ कणकवलीत दाखल झाले. त्यांनी या निराधार व्यक्तीला संविता आश्रमामध्ये दाखल केले. त्या व्यक्तीला त्याचे नाव विचारले असता तो आपले नाव मोहम्मद युसुफ ( रा. तामिळनाडू ) असे सांगितले. मोहम्मद युसुफ हा गेल्या एक महिन्यापासून कणकवली रेल्वे स्टेशन रस्त्यावर राहत होता. पुढील प्रोसेस करून सदरील व्यक्तीला संविता आश्रम येथे नेण्यात आले. यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव, हवालदार उज्वला मांजरेकर, श्री. नानचे आदी उपस्थित होते.