चिपळूण : भा.क. ल. वालावलकर रुग्णालयामध्ये 29 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 असे चार दिवसांचे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये रुग्णांनी मोफत निदान आणि शस्त्रक्रियांचा लाभ घेतला.
या चार दिवसीय शिबिरात कान, नाक आणि घसा या विभागामध्ये एकूण 25 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. या शस्त्रक्रियांमध्ये कानाचा पडदा बदलणे, नाकाचे वाढलेले हाड काढणे, टॉन्सिल्स व अॅडोनाईड् यांचा समावेश आहे. हे वैद्यकीय शिबिर यशस्वी होण्यासाठी कान, नाक आणि घसा विभागाचे डॉ. प्रतीक शहाणे, डॉ. राजीव व डॉ. सीमा यांनी अथक परिश्रम घेतले आणि सदर वैद्यकीय शिबिर यशस्वी केले.












