शालेय वस्तूंचे केले विद्यार्थ्यांना वाटप
चिपळूण ( वार्ताहर) : गोविंदराव कृषी महाविद्यालय मांडकी पालवन येथील कृषी विद्यार्थ्यांकडून नवरात्र उत्सवानिमित्त जिल्हा परिषद शाळा वहाळ येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.. वहाळ येथील ग्रामीण भागातील मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी गोविंदराव कृषी महाविद्यालय मांडकी पालवन या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला. स्पर्धा घेतल्याने जिल्हा परिषद शाळा वहाळ मधील विद्यार्थ्यांना सुध्दा आनंद झाला. शाळेतील शिक्षकांनी उत्तम.सहकार्य केले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले .
तसेच शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना तसेच उपविजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक तसेच शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित होते. ही स्पर्धा घेण्यासाठी कृषी महाविद्यायातील विद्यार्थी आदित्य काळे,प्रथमेश धुमाळ, संदेश पार्ठे, पार्थ बागल,अंकित देशमुख, तन्मय पोखरकर, अनिरुद्ध सावंत, निशांत शिंगाडे व प्रथमेश पाटील यांनी प्रयत्न केले. त्यांचीही उपस्थित होती.












