वैभववाडी न.पं.चे सचिन माईणकर यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार 

 

वैभववाडी l प्रतिनिधी :    वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीचा उत्कृष्ट प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार सचिन अनंत माईणकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या हस्ते पार पडले. पुरस्कार प्राप्त श्री माईणकर यांचे तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.

सचिन माईणकर हे गेली 14 वर्ष वाभवे- वैभववाडी ग्रामपंचायत व नगरपंचायत या ठिकाणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी उत्कृष्टपणे सेवा बजावली आहे. प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल त्यांना यंदाचा उत्कृष्ट प्रशासकीय पुरस्कार देण्यात आला आहे.

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या वैभववाडी महोत्सवात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरपंचायत व रोटरी क्लबचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.