कोळवली येथे वार्षिक क्रिडा महोत्सव उत्साहात

 

आबलोली l वार्ताहर :गुहागर तालुक्यातील ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली संचालित माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली येथे सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षासाठीच्या शाळांतर्गत दोन दिवशीय क्रिडा स्पर्धा शिस्तबद्ध पद्धतीने नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या

यावेळी माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या प्रांगणात विविध मैदानी क्रिडा प्रकारासाठी वेगवेगळी क्रिडांगणे,क्रिडा मैदाने तयार करण्यात आली होती यावेळी कब्बडीच्या मैदानाचे उदघाटन कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.माटल यांचे शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर हॉलीबॉलच्या मैदानाचे उदघाटन पाचेरी सडा गावचे जेष्ठ नागरिक श्री.गुणाजी खांबे यांनी केले व सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी २०२४ या नविन वर्षाचे कॅलेंडर भेट दिले

दोन दिवशीय क्रिडा महोत्सवात कबड्डी,को – खो , लंगडी,हॉलीबॉल आदी.क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या तसेच वैयक्तिक क्रिडा स्पर्धेत लांब उडी,धावणे,उंचउडी,फणी गेम्स,संगित खुर्चा आदी.स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या यावेळी उत्कृष्ठ खेळाडूंना मान्यवरांचे हस्ते रोख रक्कमेची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले

क्रिडा महोत्सवाची यशस्वी सांगता करण्यात आल्या नंतर संस्थेचे अध्यक्ष श्री.शांताराम वाघे, उपाध्यक्ष श्री.बाबाजी मुंडेकर, सचिव श्री.नारायण मोहिते,सह.सचिव श्री.शंकर जोशी, खजिनदार श्री.वासुदेव डिंगणकर, सदस्य श्री.नंदकिशोर सुर्वे,श्री.दामोदर डिंगणकर,श्री.रामचंद्र मोरे,श्री.सदानंद जोशी,श्री.रविंद्र गावडे,श्री.संतोष डिंगणकर आदींनी मुख्याध्यापक श्री.एम.वाय . पाटील,क्रिडा शिक्षक श्री.बी.के.लवटे यांचेसह सर्व शिक्षकांचे, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सी.एस.पांडे यांनी केले