कणकवलीत पहिल्यांदाच निघाली महायुतीची बाईक रॅली

अगदी काही वेळातच सुरू होणार महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा

केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांची असणार उपस्थिती

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आज कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात होत आहे. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरात महायुतीतील तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहरात बाईक रॅली काढली. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळल्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मात्र सर्वांचे लक्ष ज्या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे ते म्हणजे महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे.

या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांची असणार उपस्थिती आहे.