सिंधुनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संघाच्या उपाध्यक्षपदी आत्माराम बालम यांचे बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा मजूर संघाचे सभासद त्यांच्या हितासाठी आपण कार्यरत राहू अध्यक्ष व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करू अशी ग्वाही नूतन उपाध्यक्ष आत्माराम बालम यांनी याप्रसंगी दिली. जिल्हा सहकारी निबंध कार्यालयाच्या अधिकारी उर्मिला यादव यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. निवडीनंतर जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई व सर्व संचालकांनी उपाध्यक्ष आत्माराम बालक यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा मजूर संघाचे संचालक संदीप सावंत राजेंद्र प्रभू देसाई अनिल कोरगावकर सौ मेधाजी जीकमडे प्रणाली मसुरकर जयेश धुमाळ संतोष परब व्यवस्थापक गंगाराम कदम चिंतामणी राणे व दीपा सावंत आदी संचालक, कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी नूतन उपाध्यक्ष आत्माराम बालम यांचे अभिनंदन केले.












