रत्नागिरी ः प्रतिनिधी:
मित्राने विश्वासाने दिलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्यांपैकी एक अंगठी विकून तसेच एक अंगठी फायनान्स कंपनीत गहाण ठेवून त्याचे तब्बल 1 लाख 55 हजार रुपये लाटेल. याप्रकरणी संशयित मित्राविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 29 मार्च रोजी सकाळी 11 ते 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा.कालावधीत शहरातील आरोग्य मंदिर व मारुती मंदिर येथे परिसरात घडली आहे.
प्रथम जयेश खानविलकर (23,मुळ रा.राजीवडा सध्या रा.शांतीनगर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित मित्राचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रसाद रविंद्र पोकळे (25,रा.मारुती मंदिर,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तकार दिली आहे. त्यानुसार, हे दोघेही मित्र आहेत. 29 मार्च 2026 रोजी प्रसाद पोकळेने त्याच्या वडिलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या त्याचा मित्र प्रथम खानविलकर याच्याकडे अधिकचे सोने घालून काम करुन आणण्यासाठी विश्वासाने दिल्या होत्या. परंतू प्रथम खानविलकरने त्यातील एक अंगठी सोनाराला विकली. तसेच दूसरी अंगठी ही मुथ्थूट फायनान्स कंपनीत गहाण ठेवून कर्ज घेतले. अशाप्रकारे दोन्ही अंगठ्यांवर त्याने एकूण 1 लाख 55 हजार रुपये घेउन स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. दरम्यान, 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वा.सुमारास प्रसादने प्रथमकडे दोन्ही अंगठ्यांची मागणी केली. तेव्हा प्रथमने त्याला मी तुला कोणतेही पैसे देणार नाही, ना अंगठ्या देणार. जास्त त्रास दिलास तर तुझे हातपाय तोडून तुला संपवून टाकेन अशी धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
Home महत्वाच्या बातम्या मित्राने केला विश्वासघात ! विश्वासने दिलेल्या २ अंगठीपैकी एक विकली एक ठेवली...












