कुळवंडीतील ते झाड अखेर कोसळले!

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील कुळवंडी-वडाचीवाडी येथील अचानक पेटलेले वडाचे झाड अखेर रात्रीच्या सुमारास रस्त्यावर कोसळले.
यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सोमवारी सकाळच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने झाड हटवून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यासह मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, संभाजी मोहिते व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.