खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील आयनी, मेटे, सात्विनगांवाचे श्रध्दास्थान असलेल्या गजन्तलक्ष्मी भावकादेवी मंदिराचे उद्घाटन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळशारोहण सोहळा नुकताच पार पडला. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
आयनी येथील पांडेवाडी, ब्राम्हणवाडी, खोचरवाडी तसेच मेटे गावांतील गुरववाडी येथील तरूणाई गेल्या कित्येकं वर्षांपासून या देवतेची वार्षिक पूजा करत आहे. या तरूणांनी मंदिर बांधण्याचा संकल्प करत तो पूर्णत्वास नेला. मंदिर उद्घाटनानिमित्त मूर्ती मिरवणूक, रेमजेवाडी, ब्राम्हणवाडी ग्रामस्थांचे, तसेच हुतात्मा अनंत कान्हेरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे भजन, कल्याण काळे, सुप्रिया साठे यांचे कीर्तन, हळदीकुंकू, महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. मंदिराचे आकर्षक प्रवेशव्दार निरंजन दिक्षित यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधून दिले.
कार्यक्रामासाठी रोहीदास गुरव, प्रमोद आवटे, समाधान संसारे, अनंत दळवी, सचिन कान्हेरे, संतोष कान्हेरे, मनोज आवटे, प्रफुल्ल गुरव, अवधूत चितळे, प्रकाश चितळे, प्रणय कान्हेरे, अशोक खोचरे, उदय गुरव, विजय गुरव, सुभाष जाधव, संतोष आवटे, मंगेश हरमळे व रेमजेवाडीतील महिलांनी प्रयत्न केले.










