सामाजिक बांधिलकीच्या नात्याने रुग्णवाहिकेची देणगी – संजीव राऊत

देवगड : सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही उभयतानी आज देवगड तालुका मराठा समाजास ही रुग्णवाहिका दिली असून या रुग्णवाहिकेचा उपयोग गरजूसाठी व्हावा या उद्देशाने कै सौ विजयालक्ष्मी व सौ रश्मी राजीव राऊत कै सौ ललिता आणि यशवंत श्रीपत नलावडे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ आम्ही ही रुग्णवाहिका देत आहोत. यापुढेही समाजाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवणार असून यास समाजाने सहकार्य कराव. ही रुग्णवाहिका केवळ मराठा समाजासाठी नसून सर्वांसाठी आहे. अत्यंत माफक दरात ही रुग्णविका आजपासून समाजाच्या सेवेसाठी मराठा समाजाला देत आहोत असे मत माजी मुख्याध्यापक श्री संजीव राऊत यांनी रुग्णवाहिकेच्या उद्घाटन प्रसंगी मांडले.

या प्रसंगी व्यासपीठावर श्री व सौ समिरा राऊत तसेच विजय नलावडे, मधुकर नलावडे, शामराव नलावडे, रोहित राऊत ,शंकर धुरी ,सदानंद पवार, संदीप साटम, निशिकांत साटम, प्रणाली माने, शामराव पाटील, सुंदर जगताप, अजित राणे, अनघा राणे, संदीप नाईकधुरे, प्रदीप सावंत, डॉ. दत्तप्रसाद सावंत, राजेंद्र राणे, अभय पवार, सदानंद सावंत, तुषार सावंत, गोविंद घाडी, अनिकेत बांदिवडेकर, प्रकाश सावंत, शैलेश कदम, नंदन घोगळे, सतीश कदम, अजित कदम, सूर्यकांत पाळेकर, शरद ठुकरूल, रमाकांत जगताप, नवीन तावडे, काका राऊत, हर्षदा सावंत आदी मान्यवर होते. मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम म्हणाले की, राऊत सर उभयतानी दिलेली ही देणगी निश्चितच कौतुकास्पद आहे. मराठा समाज यापुढेही अशाच प्रकारचे विविध उपक्रम राबवून समाजास उपयुक्त असणारे शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम निश्चितच घेईल. या कार्यक्रमास तालुक्यातून मोठ्या संख्येने अनेक मराठा समाज बांधव उपस्थित उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा सावंत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दया पाटील,केदार सावंत, योगेश राणे, प्रवीण सावंत, किसन सूर्यवंशी, बंटी कदम यांनी विशेष मेहनत घेतली.