वेंगुर्ले | प्रतिनिधी : श्री देव मानसीश्वर पर्यटन सेवा सह. संस्था उभादांडा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक वेंगुर्ला निबंधक अधिकारी श्री. प्रशांत साळगांवकर व श्री. रुपेश मोरे यांच्या देखरेखीखाली पार पाडली. श्री देव मानसीश्वर पर्यटन सेवा सह.संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. सुशील अर्जुन चमणकर, सचिवपदी श्री. गणपत केळूसकर, उपाध्यक्षपदी श्री. प्रकाश मोटे तर खजिनदार पदी श्री. सत्यविजय मयेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. विजय वराडकर , श्री नारायण केळूसकर, श्री.वल्लभ शिरगांवकर, श्री. उत्तम आरावंदेकर, श्री. चैतन्य भूते, सौ. मनोरंजना टाककर व सौ.हर्मायणी खराडे उपस्थित होते.
सुशिल चमणकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा सचिव असून त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष संदिप पेडणेकर तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.










