खेडमध्ये लोकहीत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून २८ रोजी रक्तदान शिबीर

खेड(प्रतिनिधी) लोकहीत बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व  मैत्रय फांउडेशन सायन ब्लड बँक सायन (मुंबई)  यांच्या वतीने  रक्तदान शिबीर २८ जानेवारी २०२४ रोजी स. १० ते सायं. ५.या कालावधी मध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे आयोजित करण्यात आले आहे
रक्ताची गरज राज्यात वाढत आहे आणि गरजू लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्याला जीवनात किमान एकदा रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. विज्ञानाने हे सिध्द केले आहे की रक्त देणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि आपण दान केलेल्या रक्ताचे प्रमाण आपल्या शरीरात कमी कालावधीत पुन्हा निर्माण होत, म्हणून रक्तदान करा व सहकार्य करा. मानवतेच्या हिताचे कार्य करा,
हा संदेश देत रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
अधिक माहितीसाठी प्रशांत गमरे अध्यक्ष ७४९८५७६२०६ रोशन धोत्रे उपाध्यक्ष- ७९७२८२४३११ सचिन मोहिते सचिव – ९३२६४०१९१४ यांच्या शी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.