क्षेत्रपालेश्वर वेतोबा मधील सरपंच भूमिकेतून अभिनयाची छाप
रत्नागिरी : रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक मात्र अभिनेते म्हणून सर्वत्र परिचित असलेले प्रफुल्ल घाग यांचे शुक्रवारी कोल्हापूर येथे उपचार घेत असताना निधन झाले. ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ सिरीयलमधील सरपंचाच्या अदाकारीने त्यांना घराघरात पोचवले होते.
रत्नागिरीमध्ये जी नाट्य चळवळीची श्रीमंती आहे, ती निर्माण करण्यात ज्यांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात, ज्यांनी नाटक या तीन शब्दांसाठी विशेष कार्य केले त्यापैकी एक स्टार थिएयर्सचे प्रफुल्ल उर्फ पदू घाग यांचे शुक्रवारी संध्याकळी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने रत्नागिरीतील नाट्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पारावरच्या नाटकांपासून काम करणाऱ्या प्रफुल्ल घाग यांनी अनेक नाटकांमध्ये तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. खासगी दुरचित्र वाहिनीवरील नुकत्याच झालेल्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ सिरीयलमधील सरपंचाच्या अदाकारीने त्यांना घराघरात पोचवले होते. वेतोबा सिरीयलमधील प्रत्येक वाक्य पुन्हा पुन्हा बोलून त्यांनी दिलेली ‘पुनरुक्ती अनुभूती’ खूपच लोकप्रिय झाली होती. पटकथा लेखक राजू घाग यांचे ते बंधु होत.
प्रफुल्ल घाग यांच्या अचानक जाण्याने कोकणातील नाट्य चळवळीवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्यावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
Sindhudurg
Ratnagiri










