रशियाच्या ताब्यातील बाजारपेठेत युक्रेनचा मारा.. १८ ठार

वी दिल्ली – रशियाने ताबा घेतलेल्या दोनेस्क प्रांतातील बाजारपेठेवर युक्रेनने तोफांचा मारा केला आहे. त्यामध्ये किमान १८ जण मारले गेले असल्याची माहिती मिळते आहे. या मार्‍ यामध्ये किमान १३ जण जखमी देखील झाले आहेत.

या मार्‍ याबद्दल युक्रेनने कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. तसेच सर्वसामान्यांच्या बाजारपेठेवरच्या या हल्ल्यामागे युक्रेन असल्याची पडताळणी देखील केली जाऊ शकलेली नाही. मात्र हल्ल्यानंतर या भागात मदतकार्य सुरू करण्यात आले आहे, असे दोनेस्क प्रांतात रशियाने नियुक्त केलेल्या हंगामी प्रशासनाच्या प्रमुखांनी सांगितले.

रशियाच्या उस्त-लुगा या बंदरात कालच झालेल्या दोन मोठ्या स्फोटांमुळे रसायनांच्या वाहतूक टर्मिनललाही आग लागली होती. या बंदरावर युक्रेनच्या ड्रोनचा मारा झाला होता. त्यामुळे गॅसच्या टाक्यांचे स्फोट झाले आणि आग लागली होती, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. मात्र रशियाकडून केल्या जाणार्‍ या दैनंदिन वार्तालापामध्ये कोणत्याही ड्रोन हल्ल्याचा उल्लेख करण्यातआला नव्हता. मात्र गुरुवारी सेंट पीटर्सबर्गजवळ युक्रेनची ड्रोन पाडण्यात आली होती, असे रशियाच्या अधिकार्‍ यांनी म्हटले होते.

हे ठिकाण रशियाच्या सेंट पीटर्सबर्गपासून १६५ किलोमीटर दूरवरच्या दुसर्‍ या क्रमांकाच्या नोवातेक येथील गॅस उत्पादन प्रकल्पाजवळच आहे. या स्फोटामुळे या प्रकल्पाचे काम तात्पुरते थांबवण्यात आले असल्याचे रशियाच्या आरबीसी या कंपनीने म्हटले आहे.