पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण

रत्नागिरी : भारताचा 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता येथील छत्रपती शिवाजी स्टेडिअमवर हा मुख्य सोहळा होणार आहे. या समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.