दिमाखात व जल्लोषात पोदार इंटरनॅशनल स्कूल चा पारपडला ‘नवरस’ स्नेहसंमेलन सोहळा.

कणकवली– मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात व याच मनातील स्थिर व शाश्वत भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’म्हणतात. साहित्य कृतीच्या वाचनाने स्थायीभाव निर्माण होतात व यातूनच रस निर्मिती होते. यात विविध प्रकारचे नऊ रस मानले जातात व याच नवरसांवर आधारित कणकवलीतील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे नुकताच दिनांक 21 जानेवारी रोजी ‘नवरस’ या थीमवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत दिमाखात व जल्लोषात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कलेक्टर पदी कार्यरत असणारे श्री. किशोर तावडे हे उपस्थित होते.

इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी करुणा रस, शृंगार रस, वीर रस ,हास्य रस ,भयानक रस ,शांत रस, विभत्स रस, अद्भुत रस ,रौद्र रस अशा नवरसांवर आधारित विविध प्रकारचे संदेश देत नृत्यांचे सादरीकरण केले. तसेच पोद्दार शो, ऑर्केस्ट्रा यांचे देखील सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हे रौद्र या रसावर आधारित ‘कांतारा’ हे नृत्य ठरले.तसेच राममूर्ती प्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर आधारित राम ,लक्ष्मण, सीता व हनुमान यांची देखील नृत्य व देखावा विद्यार्थ्यांद्वारे दर्शवण्यात आला. या सर्व विविध प्रकारच्या अनोख्या नृत्याविष्कारानी उपस्थित सर्व पालक, प्रेक्षक व दर्शक यांना एका नेत्रदीपक सोहळ्याची अनुभूती मिळाली. विविध स्तरांवर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.शाळेच्या प्रचार्या सौ.स्वाती कणसे यांनी संपूर्ण शैक्षणिक वर्षाचा आढावा देत वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे श्री तावडे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी कशी तयारी करावी व त्यातून कसे हे संपादन करावे याबद्दल विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले तसेच या शाळेतून अनेक चांगल्या व यशस्वी विद्यार्थी घडावेत अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्य सौ. स्वाती कणसे , कोल्हापूर हब चे जीएम श्री एस पी कुलकर्णी, पोद्दार स्कूल सांगलीचे प्राचार्य सी जी बी पाटील ,पोद्दार स्कूल रत्नागिरी चे प्राचार्य श्री राकेश चव्हाण, आमदार श्री वैभव नाईक , श्री रघुनाथ नाईक , एडवोकेट उमेश सावंत , श्री अविनाश कणसे , श्री किशोर काळे , श्री किशोर गवस , श्री राजेंद्र गायकवाड व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर उपस्थित सर्व पाहुणे, पालक व प्रेक्षक या सर्व स्तरातून अशा या यशस्वी आयोजनासाठी शालेय व्यवस्थापनावर कौतुकाचा वर्ष करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी विनीत शिरसाट, ईशान नागवेकर ,आर्य नवरे ,पर्णा नायगावकर, मिहीर सावंत मानसी बोभाटे व उर्वी गव्हाणकर या विद्यार्थ्यांनी केले.