भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंचे ठाकरेंच्या टीकेवर सुनावले
ठाकरेंच्या “त्या ” सभा म्हणजे विनायक राऊत यांच्या सेंड ऑफ सभा
जनतेच्या मनामनात राणे आणि भाजप शिव्यांची परत फेड करणार
भाजपा सोबत येण्यासाठी उध्दव ठाकरे यांची धडपड
दहा वर्षे विनायक राऊत खासदार म्हणून काय काम केले त्याचा हिशोब देवू शकले नाहीत
कणकवली : रविवार असूनही सुट्टी दिवशी या भटक्या कुत्र्यांच्या सभेचा जिल्हावा सीयांना त्रास झाला. मला जनतेतून फोन आले की ज्यांनी तुम्हाला शिव्याशाप देत खालच्या पातळीवर टीका केली त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्तर देऊ.जिल्ह्यात झालेल्या तिन्ही सभा म्हणजे विनायक राऊत यांच्या सेंड ऑफ ची सभा असल्याची टीका भाजपा प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली.
गावागावात मोठ्या प्रमाणात भाजपात होत असलेले पक्षप्रवेश आणि मतदारसंघात होत असलेली विकासकामे पाहता मला उबाठा च्या कालच्या सभेची दखल घ्यावीशी वाटत नाही.माझ्या मतदारसंघात जनतेला त्रास होईल, पोलीस छावणी उभी राहील असे वातावरण मी निर्माण करणार नाही.दुसऱ्यांना गद्दार म्हणणारा उद्धव ठाकरे किती मोठा गद्दार हे जनतेने पाहिले होते.2019 च्या निवडणूक मध्ये देशात युती असताना माझ्या मतदारसंघात विरोधी उमेदवार उभा केला.तरीही मी 2014 पेक्षा जास्त मताधिकक्याने विजयी झालो. या मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणूक मध्ये 80 टक्के सरपंच भाजपाचे आहेत. गेली 10 वर्षे फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने विनायक राऊत खासदार झाले.मग 10 वर्षांत खासदार म्हणून राऊत यांनी जनतेच्या विकासासाठी काय केले याचा हिशोब कालच्या सभेत देणे गरजेचे होते. जिल्ह्यात झालेल्या तिन्ही सभा ह्या विनायक राऊत याच्या निरोपाच्याच सभा होत्या. माझ्यावर संघाच्या विचारांचा पगडा आहे.मी संघ परिवाराचे विचार आत्मसात करत आहे त्यामुळे उद्धव च्या शिव्यांना उत्तर देणार नाही.
राणे कुटुंबाचा उल्लेख केल्याशिवाय तुमची साधी कॉर्नर सभा होत नाही, तुमचा दौरा होत नाही, आमच्यावर टीका केल्याशिवाय तुमची सभा होत नाही.यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डीएनए मध्ये राणे आणि भाजपा किती रुजला आहे हे दिसून येते.घोडामैदान जवळ आहे.लोकसभा निवडणुकीत महायुती च्या उमेदवाराच्या विजयात कणकवली विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असेल. मला ज्या शिव्या घातल्या त्याचे उत्तर माझी जनताच देईल. आदित्य च्या डोक्यावर हात ठेवून सांगा की भाजपा सोबत युती करण्यासाठी तुम्ही किती खटपट करताय, कोणत्या हॉटेलमध्ये फोन जातायत, कुठल्याही अटी शर्तीशिवाय भाजपसोबत यायला तयार असल्याचे निरोप देताय. ज्या महाविकास आघाडी सोबत आहात त्यांच्या पाठीत उद्धव खंजीर खुपसत आहे. त्याचा डीएनए तपासणे गरजेचे आहे अशी टीका ही नितेश राणे म्हणाले.












