बांद्यात शिवजयंती सोहळ्याला भव्य चित्ररथ स्पर्धा

बांदा शिवप्रेमी मंडळाचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : बांदा शिवप्रेमी मंडळाच्या वतीने शिवजयंती सोहळा भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात नियोजन सभा भूमिका मंदिर येथे संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य खुली चित्ररथ स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेत सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील चित्ररथ सामील होणार आहेत. सहभागी संघांना रोख बक्षिसे देण्यात येतील. लहान मुलांच्या वेशभुषा स्पर्धा सुद्धा होणार असून विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतील. सकाळी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर गडगेवाडी येथील शिवपुतळ्याकडून चित्ररथ व रॅली निघणार असून बांदा शहर व बांदेश्वर मंदिर पर्यंत रॅली येईल.

नियोजन सभेला बांदा सरपंच प्रियांका नाईक, बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, माजी अध्यक्ष बाळू सावंत, माजी सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच जावेद खतिब, ग्रा. पं. सदस्या रुपाली शिरसाट, निलेश कदम, राजेश सावंत, सर्वेश गोवेकर, फिरोज खान, हेमंत मोर्ये, माजी खजिनदार राकेश परब, संजय सावंत, बांदा मराठा महिला समाज अध्यक्षा स्वाती सावंत, समन्वयक लक्ष्मी सावंत, माजी पं. स. सदस्या राखी कळगुंटकर, दीक्षा सावंत, ममता सावंत, अस्मिता माजगावकर, शैलेश केसरकर, राकेश केसरकर, जयप्रकाश सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, केदार कणबर्गी, शुभम बांदेकर, संकेत वेंगुर्लेकर, नारायण बांदेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अंतिम नियोजन करण्यासाठी गुरुवार ८ फ्रेब्रुवारी रोजी सभा घेण्यात येणार आहे. या सभेत बांदा शिवप्रेमी यांची शिवजयंती उत्सव कमिटी तयार करण्यात येणार आहे. सर्वांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.