ज्या आमदारांना सांगितले त्याचे पुरावे आहेत
आमदार नितेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट
कणकवली : कणकवलीतील भर जाहीर सभेत उद्धव ठाकरे चा एकेरी उल्लेख करून उद्धव ठाकरेंची लायकी भास्कर जाधव यांनी काढली. बाळासाहेब ठाकरे असताना कोणाची हिम्मत झाली होती काय ? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. हाच भास्कर जाधव आदित्य ठाकरे बद्दल काय बोलला हे काही आमदारांना विचारा.आदित्य हा समलैंगिक आहे, तो मुलीशी लग्न करणार नाही असे ज्या आमदारांकडे भास्कर जाधव बोलला त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा गौप्यस्फोट ही आमदार नितेश राणे यांनी केला.
उध्दव ठाकरे आणि ठाकरे वहिनी यांनी आमदार वैभव नाईक यांची प्रॉपर्टी मोजण्यापेक्षा जिल्ह्यात किती ग्रामपंचायती उबाठा कडे आहेत हे मोजणे गरजेचे होते.असा टोला लागवला. मग खासदार, आमदार निवडून येतील की नाही हे कळले असते.उध्दव ठाकरे यांना बाळासाहेब कधीच कळले नाहीत म्हणून ते बाप चोरला अशी विधाने करत आहेत.त्याची रुद्राक्ष या माणसाने कचऱ्याच्या डब्यात फेकली.त्यांना काय कळणार बाळासाहेबांची उंची.आता दिशा सालियान केस सुरू झाली की सर्वच तडीपार होतील अशी टीका केली.











