नीलमताई राणे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे राहणार उपस्थित
स्वप्नील कदम lकुडाळ :पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्सची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दमदार एंट्री झाली असून जिल्ह्यातील पहिलीच शाखा कुडाळ येथे होत आहे. हा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. संपन्न होणार आहे पीएनजी ज्वेलर्सचा उद्घाटन सोहळा नीलमताई नारायण राणे यांच्या हस्ते तसेच सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे तसेच सारस्वत बँक संचालक सुनील सौदागर गुरुवर्य चंद्रकांत नाडकर्णी आधी उपस्थित राहणार आहेत. पीएनजी शाखा कुडाळ हायस्कूल समोर सारस्वत बँक शेजारी कुडाळ वेंगुर्ला रोड पडतेवाडी येथे भव्य दालन उभारण्यात आले आहे उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असून या उद्घाटन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सौरभ गाडगीळ पराग गाडगीळ संजय पिंगुळकर अजय पिंगुळकर यांनी केले आहे.












