कणकवली : ल. गो. सामंत विद्यालयचे यश प्रशालेतून NMMS परीक्षेसाठी अकरा पैकी चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी कुमार श्रुतिक श्रीकृष्ण घाडीगांवकर याला सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली त्याला इयत्ता नववीत 9600 ₹ दहावीत 9600 ₹ अकरावी 9600 ₹ बारावी 9600 ₹ असे एकूण चार वर्षात 38400 ₹ शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. त्या निमित्ताने शालेय समिती अध्यक्ष श्री. डॉ. सुहास पावसकर यांच्या हस्ते श्रुतिक व इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन सौ सुमन तांबे यांनी केले.








