सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील सारस्वत बँकेसमोर मोती तलावाच्या काठावर बसलेला मद्यधुंद इसम तलावात पडला. याची माहिती मिळताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर दोरखंड पाण्यात टाकून त्याला जिवदान देण्यात आले. त्याला तलावातून बाहेर काढण्यात आले.

मनोज जाधव ( रा. सातारा ) असे त्याचे नाव आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी खासकीलवाडा येथील अजित मांजरेकर यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, सदर मद्यधुंद इसम हा तलावात पडल्याने जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.












