साटवली ते वणू दुकान रस्ता काम निकृष्ट दर्जाचे

अन्यथा आंदोलन करणार- मनसे तालुका उपाध्यक्ष संदीप मेस्त्री

लांजा (प्रतिनिधी) तालुक्याच्या पश्चिम भागातील साटवली ते वणु दुकान या दरम्यान रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असून हे काम एस्टिमेट प्रमाणे होत आहे की नाही याची प्रत्यक्ष चौकशी करा., अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे उपतालुका अध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग लांजा यांना दिलेल्या निवेदनात मेस्त्री यांनी म्हटले आहे की, मलकापूर अणुस्कुष्कारा-ओणी साटवली पावस रोडवरील साटवली ते वणु दुकान या रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असून त्या रोडला लेव्हल नाही .साईड पट्टी नाही ,लेअरनुसार काँक्रीट करण झालेले नाही. गटार लाईन व्यवस्थित नाही .त्यामुळे येत्या पावसात हा रोड कितपत तग धरेल आणि गटार किती दिसण्यात येईल याबाबत शंकाच आहे.
त्यामुळे सदर रस्ता हा इस्टिमेट आणि वर्क ऑर्डर प्रमाणे झाला आहे की नाही याची आपण प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच त्याप्रमाणे काम न झाल्यास या कामाची बिले स्थगित करावे. आणि तरीही बिल पाहणी न करताच पास केल्यास येणाऱ्या काळात रोड व्यवस्थित न राहिल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार आपण रहाल आणि अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन छेडील असा इशारा संदीप मेस्त्री यांनी दिला आहे.
या निवेदन सादर करताना तालुका अध्यक्ष मनोज देवरुखकर ,अध्यक्ष दिलीप लांजेकर, विभाग अध्यक्ष सागर मेस्त्री, शाखा अध्यक्ष संतोष साळुंखे, तसेच सचिन मडवे ,संकेत कोलते ,शिवाजी गुरव, संजय ठीक आदी उपस्थित होते.