खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरील आडवली- आर्चिणे विभागादरम्यान शुक्रवारी सकाळी ९ ते सकाळी ११.३० यावेळेत अडीच तासाच्या घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे ६ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडले.
सावंतवाडी-दिवा पॅसेंजर ३ तास विलंबाने धावली. अन्य ५ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवासी खोळंबले. या. मेगाब्लॉकमुळे क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर सावंतवाडी- कणकवली विभागादरम्यान १ तास ३० मिनिटे थांबवण्यात आली होती. याबाबत रेल्वेप्रशासनाने यापूर्वीच जाहीर देखील केले होते. मात्र तरीही पॅसेंजर निर्धारित वेळेपेक्षा दीडतास म्हणजेच मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना फटका बसला.
१२०५१ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस १ तास २० मिनिटे उशिराने रवाना झाली. १०१०४ क्रमांकाची मडगाव- सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस १ तास १५ मिनिटे तर १११०० क्रमांकाची मडगाव-एलटीटी एक्सप्रेस १ तास १० मिनिटे उशिराने धावली. १२६१८ क्रमांकाची निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे, तर २२११९ क्रमांकाची सीएसएमटी- मडगाव तेजस एक्सप्रेस १ तास ४० मिनिटे विलंबाने मार्गस्थ झाली. रेल्वेगाड्या त्या त्या स्थानकात उशिराने दाखल होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने प्रवाशांना सूचित करण्यात येत होते.









