शेवरे येथील श्री बांदकादेवी मंदिराचा गुरुवारी वर्धापनदिन सोहळा

विविध कार्यक्रमाचे आयोजन 

शिरगाव (वार्ताहर)  देवगड तालुक्यातील शेवरे येथील श्री बांदकादेवी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा माघ शु.षष्ठी गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ वाजता धार्मिक विधी- गणेश पुजन, अभिषेक, होमहवन, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी १२.३० वाजता आरती, मंञपुष्प, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ वाजता हळदीकुंकू समारंभ, सांयकाळी ५ ते ८ स्थानिक भजने, राञी ८ वाजता स्थानिक दिंडी भजन, राञी १० वाजता २०×२० डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे.हा सामना बुवा श्री अरुण घाडी ( श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ पावशी, कुडाळ) आणि बुवा श्री समीर कदम (श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोखरण,कुडाळ) यांच्यात होणार आहे.

या सोहळ्यात आपण मिञमंडळीसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे श्री ठाणेश्वर बांदकादेवी जिर्णोध्दार मंडळ शेवरे, (मुंबई आणि स्थानिक ) यांनी कळविले आहे.