देवगड जामसंडे नगरपंचायतीचे माजी नगरसेवक गणपत उर्फ बाळा गावकर यांची शासनातर्फे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे
नुकतीच नेमणूक झाले ते पत्र व सही शिक्के बाळा गावकर यांना देण्यात आले. बाळा गावकर यांनी अनेक पक्षीय पदे भूषवली असून त्यांनी देवगड जामसांडे नगरपंचायतीचे नगरसेवक पदही भूषवले आहे. बाळा गावकर हे विशेष कार्यकारी अधिकारी झाल्यामुळे झेरॉक्स प्रत सत्यप्रत करून मिळणे तसेच इतर शासकीय कामे करणे याबाबत फार मोठी सोय नागरिकांची झाली आहे बाळ गावकर यांचे या नेमणुकीबद्दल अभिनंदन होत आहे












