१४ फेब्रुवारी २०२४ ते शनिवार १७ फेब्रुवारी २०२४ होणार शिबीर
कणकवली : कणकवली नगर पंचायत क्षेत्रातील आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ( ५ लाख विमा ) या योजनेत नावे येऊनही अजूनही नोंदणी न केलेल्या पिवळे व केशरी कार्डधारक ( ज्यांना धान्य मिळते ) अश्या ३२५३ लाभार्थीची यादी कणकवली नगरपंचायतला प्राप्त झाली असून यातील जास्तीत जास्त लाभार्थी यांना यांचा लाभ मिळावा या साठी नगरपंचायतने कणकवली नगरपंचायत येथे विशेष मोफत कार्ड नोंदणी शिबिर बुधवार १४ फेब्रुवारी २०२४ ते शनिवार १७ फेब्रुवारी २०२४ सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजित केले आहे.
सदर शिबिराला येताना आधार कार्ड किंवा रेशन कार्ड व आधार लीक मोबाईल घेऊन येणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थी यानी कार्ड नोंदणी करावी असे आवाहन कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ व प्रशासक जगदीश कातकर यांनी केले आहे.











