खेड(प्रतिनिधी)कोकण मार्गावरून धावणाऱ्या ८ रेल्वेगाड्यांना बुधवारी लेट धावल्या कोकण मार्गावर तपासणीसाठी आलेल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही विलंबाच्या प्रवासाचा फटका बसला. मंगला एक्सप्रेस ४ तास उशिरानेच मार्गस्थ झाली. अन्य ७ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याचे नेमके कारण समजू शकले नाही
कोकण मार्गावर कोकण रेल्वेचे विभागीय संचालक संतोषकुमार झा हे बुधवारी कोकण मार्गावर रेल्वे स्थानकातील तपासणीसाठी आले होते. रत्नागिरी येथून कामकाज आटपून सावंतवाडी-दिवां गाडीने येथे स्थानकात दाखल झाले. येथील स्थानकाची तपासणी केल्यानंतर ते मांडवी एक्सप्रेसमधून विलंबाचा प्रवास करत मुंबईला रवाना झाले. बुधवारी कोकण मार्गावरून धावणारी १२६१८ क्र.ची निजामुद्दीन-एरणाकुलम एक्सप्रेस ४ तास उशिराने धावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावालागला.
१०१०३ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई – मडगाव मांडवी एक्सप्रेस १ तास १० मिनिटे तर १०१०४ क्रमांकाची मडगाव सीएसएमटी मुंबई-मांडवी एक्सप्रेस १ तास ४० मिनिटे उशिराने धावली. १०१०५ क्रमांकाची दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे विलंबाने रवाना झाली. या पाठोपाठच १२२८३ क्र.ची एरणाकुलम – निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस १ तास तर १२४४९ क्र.ची गोवा- संपर्कक्रांती एक्सप्रेसही १ तास उशिरानेच मार्गस्थ झाली. १६३३६ क्र.ची गांधीधाम एक्सप्रेसही १ तास १५ मिनिटे उशिराने रवाना झाली. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांपाठोपाठ रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही फटका बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.












