सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहर भाजपाचे माजी अध्यक्ष प्रथितयश सुवर्णकार ॲड. संजु शिरोडकर यांची सावंतवाडी सहकारी पतपेढीवर व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपाच्या सावंतवाडी विधानसभा कार्यालयात विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते पुष्पगुच्छ त्यांना सन्मानीत करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, जिल्हा कार्यकारीणी सदस्य मनोज नाईक, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंधावळे, मंडल उपाध्यक्ष दिलीप भालेकर , मंडल सरचिटणीस विनोद सावंत , माजी नगरसेवक आनंद नेवगी , सोशल मिडीया केतन आजगांवकर, वेंगुर्ले ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, किसान मोर्चा जि. चिटणीस विजय रेडकर , किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद उर्फ बिट्टु गावडे, संदिप देसाई आदी उपस्थित होते.








